Posts

Showing posts from 2009

जेंव्हा तुझ्या बटांना......

श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली हि अजरामर गझल. काय भाव आणि काय गायकी......अगदि अप्रतिम.... येथे टंकून ठेवतो. जेणेकरून कधी हि वाचून आनंद घेता येईल. जेंव्हा तुझ्या बटांना...... जेंव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा माझा ना राहतो मी, हरवून हा किनारा ॥धृ॥ आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी, ओढून जिव घेते, पदरावरील नक्षी, लाटाच अंतरीच्या, नही मुळी निवारा ॥१॥ डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुके ना, ही वेल चांदण्याची, ओठावरी झुकेना, देशील का कधी तु, थोडा तरी ईशारा ॥२॥ नशीबास हा फ़ुलांचा, का सांग वास येतो, हासून पाहील्याचा, नुसताच भास होतो, केव्हा तुझ्या खुशिचा, उगवेल सांग तारा ॥३॥